डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रशियाबरोबर शांती चर्चा करण्याचा युक्रेनचा प्रस्ताव

वाढत्या भूराजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाबरोबर शांती चर्चा नव्याने सुरु करण्याचा प्रस्ताव युक्रेनने ठेवला आहे. युक्रेनचे नवनियुक्त  राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण मंत्री रुस्तुम उमरोव्ह यांनी हा प्रस्ताव रशियाकडे मांडला आहे. त्याला रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्जी रियाबकोव्ह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत म्हटलंय की चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचीच रशियाची भूमिका आहे.

 

रशियाने काल युक्रेनच्या लष्करी औद्योगिक ठाण्यांवर भेदक क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीररीत्या जखमी झाले. अमेरिकेने कडक व्यापारी निर्बंध घालण्याची धमकी देत सुचवलेल्या ५० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्तावही रशियाने मोडीत काढल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शांति चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.