डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 16, 2025 9:45 AM | Ukraine Russia

printer

युक्रेनचे राष्ट्रपती चर्चेला उपस्थित राहणार नाही

रशिया आणि युक्रेन दरम्यान आज इस्तंबूल इथं शांतता चर्चा होणार आहे. मात्र या चर्चेला आपण उपस्थित राहणार नसल्याचं युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेंस्की जाहीर केलं आहे. उभय देशांमधील तणाव कमी करण्यासाठी झेलेंस्की यांनी संरक्षणमंत्री रुस्तम उमेरोव यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अंकारामध्ये संवादासाठी युक्रेन वचनबद्ध आहे, परंतु रशियाच्या हेतुबद्दल शंका असल्याचं झेलेंस्की यांनी म्हटलं आहे. मॉस्कोच्या प्रमुख निर्णय घेणाऱ्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीकडेही त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं असून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो देखील या शांतता चर्चेत सहभागी होणार नाहीत, हेही अधोरेखित केलं आहे. जोपर्यंत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन समोरासमोर भेटून चर्चा करत नाहीत तोपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष प्रगती संभवत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.