युक्रेनला ९० अब्ज युरो कर्ज देण्यावर युरोपियन युनियनच्या नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. युक्रेनला साहाय्य करण्यासाठी रशियाच्या गोठवलेल्या संपत्तीचा वापर करण्यावर सहमती न झाल्यामुळे युरोपियन युनियननं या निर्णयाला अर्थसंकल्पीय समर्थन दिलं. ब्रुसेल्स इथल्या शिखर परिषदेत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ही कर्जाची रक्कम पुढली दोन वर्ष युक्रेनची लष्करी आणि आर्थिक गरज पूर्ण करेल असा युरोपियन युनियनचा अंदाज आहे.
Site Admin | December 19, 2025 1:44 PM | European Union | Ukraine
युक्रेनला कर्ज देण्यावर युरोपियन युनियनच्या नेत्यांची सहमती