रशियामध्ये सारातोव्ह आणि समारा प्रांतातल्या तेल शुद्धिकरण कारखान्यांवर यूक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही कारखान्यात स्फोट झाले आणि आग लागली.
रशियाच्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी यूक्रेनने मॉस्कोच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या रशियाच्या तेल शुद्धिकरण आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केल्याचं स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.