March 8, 2025 8:52 PM | Russia-Ukraine

printer

युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या हल्ल्यांमध्ये १४ जण ठार

युक्रेनमधील डोनेस्क आणि खारकीवसह अनेक भागांत रात्रभर सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यांमध्ये १४ जण ठार ठाले. युक्रेनच्या  अधिकाऱ्यांनी सांगितलं की रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं, अनेक रॉकेट आणि ड्रोनच्या सहाय्यानं डोब्रोपिलिआवर हल्ला केला. यात आठ मजली इमारती आणि ३० वाहनांचं नुकसान झालं. 

 

दुसरीकडे, युक्रेनला माहिती देणं थांबवण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेची अंतराळ कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीज् ने युक्रेनला उपग्रह छायाचित्रं पाठवणं बंद केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.