अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्या होणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या बरोबरच्या बैठकीत युक्रेन बाबत एकतर्फी तोडगा काढू नये. असं आवाहन युरोपियन नेत्यांनी केलं आहे. जर्मनीचे व्हाईस चांसलर फ्रेडरिक मर्ज यांच्या बरोबर झालेल्या दृरदृश्य बैठकीत हे आवाहन करण्यात आलं. या बैठकीला जर्मनी, डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमिर झेलेन्स्की उपस्थित होते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आपल्या अटी आणि शर्तींवर युद्ध थांबवतील अशी भितीही अनेक युरोपियन देशांनी या बैठकीत व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी या नेत्यांना आश्वस्त केलं आहे की बैठक संपल्यावर ते चर्चेचा तपशील त्यांना सांगतील. पुतीन यांच्या बरोबरची बैठक चांगली झाल्यास त्या पाठोपाठ पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात बैठक घडवली जाईल असंही ते म्हणाले.