युक्रेनच्या उत्तरेकडे सुमी प्रदेशातल्या शोस्तका इथं एका प्रवासी रेल्वेवर रशियाने ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 30 लोक जखमी झाले असल्याचं प्रादेशिक गव्हर्नर ओलेह ह्रीहोरोव्ह यांनी आज सांगितलं. ते म्हणाले की हा हल्ला शोस्तकाहून राजधानी कीएवकडे जाणाऱ्या ट्रेनवर झाला. डॉक्टर आणि बचावकर्ते घटनास्थळी काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मॉस्कोने युक्रेनच्या रेल्वेवर आपले हवाई हल्ले वाढवले आहेत, गेल्या दोन महिन्यांत दररोज त्यावर हल्ला होत आहे, असंही ते म्हणाले.
Site Admin | October 4, 2025 8:01 PM | Ukraine
युक्रेनमधे एका प्रवासी रेल्वेवर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुमारे 30 जण जखमी
