ग्रीनलँडच्या मुद्द्यांवर आयात शुल्क वाढवण्याची अमेरिकेची धमकी चुकीची-कीर स्टार्मर

ग्रीनलँडच्या मुद्द्यांवर आयात शुल्क वाढवण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी चुकीची आहे. व्यापार युद्ध हे कोणाच्याही फायद्याचं नसतं असं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलंय. ग्रीनलँड आणि डेनमार्कच्या मूलभूत हक्कांना ब्रिटनचा पाठिंबा आहे आणि युरोप, नाटो आणि अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही ते म्हणाले. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी १० टक्के अतिरीक्त आयातशुल्क लादण्याची धमकी दिली होती.