डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्या भारत दौऱ्यावर

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. ९ ऑक्टोबर रोजी स्टार्मर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतील. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा, पर्यावरण आणि ऊर्जा, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांबाबत दोन्ही देशांमधे दहा वर्षांच्या भागीदारीचं धोरण आखण्यात आलं आहे. यावेळी दोन्ही नेते विविध उद्योगांच्या प्रमुखांशीही चर्चा करणार आहेत. तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

 

त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि प्रधानमंत्री कीर स्टार्मर मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमधे सहभागी होतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. इथं दोन्ही नेते उद्योग तज्ञ, आणि विविध धोरणकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

 

दरम्यान, नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन उद्या येत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल.