डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 31, 2025 10:29 AM

printer

UK मध्ये पहिल्यांदाच राजघराण्याचा खगोलशास्त्रज्ञ म्हणून एका महिलेची नियुक्ती

युनायटेड किंग्डममध्ये पहिल्यांदाच राजघराण्याचा खगोलशास्त्रज्ञ म्हणून एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रोफेसर मिशेल डोहर्टी यांना ही ऐतिहासिक संधी मिळाली आहे. राजघराण्याचा खगोलशास्त्रज्ञ हे एक प्रतिष्ठीत पद असून 1675 पासून आतापर्यंत साडेतीनशे वर्षांच्या काळात कधीच महिलांना ही संधी मिळाली नव्हती.

 

पारंपरिकरित्या युकेच्या राजघराण्याला खगोलशास्त्राबाबत सल्ला देणे आणि लोकांची अंतराळ तसंच विज्ञान क्षेत्रातली रुची वाढवण्याचं काम या पदावरील व्यक्तीकडून केलं जातं. प्रोफेसर डोहर्टी यांनी नासाच्या कासिनी अभियानात काम केलं होतं.