भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं देशभरातल्या शाळांना पाच ते १५ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक माहिती वेळेत ताजी करण्यास सांगितलं आहे.
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी यासंदर्भात सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या माहिती संकलनासाठी शिबिरं आयोजित करण्याची विनंती केली.
प्राधिकरण आणि शालेय शिक्षण विभागाच्या या संयुक्त उपक्रमाद्वारे देशभरातल्या १७ कोटी बालकांची बायोमेट्रिक्स माहिती ताजी करणं सोपं होईल अशी अपेक्षा आहे.