भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) पालकांना ७ वर्षे आणि त्यावरील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला विकासात्मक कारणांमुळे बोटांचे ठसे किंवा बुबुळ स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. मात्र एकदा मूल पाच वर्षांचे झाले की, हे बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे
आणि जर ते ५ ते ७ वयोगटातील असेल तर ही प्रक्रिया मोफत आहे. जर ७ वर्षांच्या वयानंतरही अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण झाले नाही, तर आधार क्रमांक निष्क्रिय केला जाऊ शकतो. अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी UIDAI ने अशा मुलांच्या आधारमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे.