सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. नेट परीक्षा दिनांक 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देण्यात आली. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर आहे. परीक्षा कोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल, याची यादी परीक्षेच्या 10 दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. याबाबत सविस्तर माहिती यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Site Admin | October 19, 2025 9:28 AM | UGC NET Exam
यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
