घटकपक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यास आपला पाठिंबा – उद्धव ठाकरे

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, आपला त्याला पाठिंबा आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.