डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे – उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीची लढाई ही महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गातल्या प्रचारसभेवेळी म्हणाले. सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथे आज ठाकरे यांच्या प्रचारसभा झाल्या. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर वचननाम्यातल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.