डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाविकास आघाडीला निवडून देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये आज घेतलेल्या प्रचार सभेत पाच आश्वासन मतदारांना देत महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं. 

 

महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतीमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. विद्यार्थींनीबरोबरच विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिलं जाईल, महिला पोलिसांची भरती केली जाईल तसंच महिला पोलिस कर्मचारी असलेली पोलिस ठाणी राज्यात सुरू केली जातील. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरं दिली जातील, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल करणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेलासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले जातील, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.  सुरतमध्येही महाराजांचं मंदिर उभारण्याची इच्छा देखील ठाकरे यांनी व्यक्त केली.  

 

राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी आज आदमापूर इथं जाहीर सभा घेतली.