विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्ता असताना ते काहीही करू शकले नाही. तरी त्यांना पुन्हा सत्ता हवी असल्याचं फडणवीस म्हणाले. दोन्ही भावांना एकत्र आणल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.