उद्धव-राज यांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतल्या जागावाटपाबाबत दोन्ही नेत्यांमधे चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मतदारयाद्यांमधल्या त्रुटी तसंच मनसेचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबत काँग्रेसच्या विरोधी भूमिकेबाबतही दोघांनी चर्चा केली. बृहन्मुंबई महानगरपालिका, नाशिक आणि पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही पक्षांची आघाडी महत्त्वाची मानली जात आहे.