प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले उडान यात्री कॅफे लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई मंत्री के. राममोहन नायडू यांनी केली. देशात विमानसेवा वाढवण्यावर भर असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत आयोजित पश्चिम क्षेत्र मंत्री परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेही यावेळी उपस्थित होते. देशातलं सर्वोत्तम ऑफ शोअर एअरपोर्ट मुंबईत उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी दिली.
Site Admin | July 12, 2025 1:21 PM | Udan Yatri Cafe
‘उडान यात्री कॅफे’ लवकरच सुरू होणार
