डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची बैठक

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची सहावी बैठक काल रियाध इथं झाली. भारतीय सशस्त्र दलाचे संयुक्त सचिव, अमिताभ प्रसाद आणि सौदी अरेबियाचे सामरिक बाबींचे संरक्षण उपमंत्री, मेजर जनरल सलमान बिन अवध अल-हरबी यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या संरक्षण कार्यांचा व्यापक आढावा घेतला. या चर्चेमध्ये संयुक्त सराव, तज्ञांची देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योग सहकार्य यासह लष्करी सहकार्य, आदी विषयांचाही पैलूंचा समावेश करण्यात आला होता.