२० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित मलिकला रौप्य पदक

बल्गेरियात सामोकोव्ह इथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित मलिक याने रौप्य पदक मिळवलं आहे. अंतिम फेरीत त्याला रशियाच्या मॅगोमेड ओडझामिरो याच्याकडून ५-८ असा पराभव पत्करावा लागला. महिला गटात सृष्टीने ६८ किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत जर्मनीच्या लॉरा कोहलर हिच्यावर ७-३ असा विजय मिळवला. तर ५७ किलो वजनी गटात तपस्या हिने जपानच्या सोवाका उचिदा हिला ४-३ असं पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं.