August 24, 2025 3:00 PM

printer

यू-२० जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात

बल्गेरियातल्या समोकोव्ह इथं सुरु असलेल्या यू-२० जागतिक कुस्ती स्पर्धेत आज मैदानात उतरलेल्या  भारताच्या ग्रीको-रोमन गटातल्या  सर्व पाच  कुस्तीपटूंना पराभव पत्करावा लागला, यामुळं  या स्पर्धेतलं  भारताचं आव्हान  संपुष्टात आलं.

 

या स्पर्धेत एकमेव पदक विजेता ठरलेल्या सूरजनं  ६० किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत  महिलांच्या गटानं  सात पदकांसह उपविजेतेपद मिळवलं, तर पुरुषांच्या फ्रीस्टाईल गटात ५७ किलो वजनी गटात  सुमित मलिकनं  एक रौप्यपदक जिंकलं.