१९ वर्षाखालच्या, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या सामन्यात भारतानं मलेशियापुढं विजयासाठी ४०९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मलेशियानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून ४०८ धावा केल्या. त्यात अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे. त्यानं नाबाद २०९ धावा केल्या. त्यात १७ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. वेदांत त्रिवेदीनं ९० तर वैभव सूर्यवंशीनं ५० धावांचं योगदान दिलं. मलेशियातर्फे महंम्मद अक्रमनं पाच गडी बाद केले.