डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग चक्रीवादळाचा जोर तीव्र

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग या चक्रीवादळानं तीव्र स्वरूप घेतलं असून, त्याच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस, विनाशकारी वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशाच्या मोठ्या भागात वादळाचा इशारा देण्यात आला आला असून, पूर्व आणि उत्तरेकडच्या भागातल्या १ लाखापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं  आहे. फिलिपिन्समध्ये ३०० पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती  नागरी हवाई वाहतूक नियामक संस्थेनं दिली.