डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

व्हिएतनाममधे बुआलोई वादळामुळे, पूर आणि भूस्खलनामुळे ३४ जणांचा मृत्यू

व्हिएतनाममधे बुआलोई वादळामुळे आणि त्यानंतर आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता आहेत, तसंच १४० जण जखमी झाले आहेत. या आपत्तीमुळे ३५६ दशळक्ष डॉलरचं आर्थिक नुकसान झालं आहे. वादळामुळे पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास ८ हजार दोनशे वीजेचे खांब कोसळले आहेत, त्यामुळे २७ लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तसंच तीन हजार रस्ते पूर आणि भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. प्रशासन परिस्थितीचा आढावा घेत असून बाधितांना मदत पोहोचवत आहे.