डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर येत्या फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर परततील

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर येत्या फेब्रुवारी महिन्यात, पृथ्वीवर परततील. हे दोघं मुळात ८ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. मात्र त्यांच्या अंतराळयानात उद्भवलेल्या अनपेक्षित समस्येमुळे त्यांना जवळजवळ ८ महिने अंतराळात घालवावे लागत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे आता खास क्रू ड्रॅगॉन अंतराळ यान पाठवलं जाणार आहे. हे अंतराळ यान अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणाली आणि परतीच्या प्रवासात अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री देण्यासाठी अतिरिक्त सुविधांनी सज्ज असेल. ही मोहिम यशस्वी होईल, असा विश्वास नासाचे प्रशासक बिल नेलसन यांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेचं सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल.