June 5, 2025 10:30 AM

printer

रामसर वारसास्थळांच्या यादीत २ पाणथळ प्रदेशांचा समावेश

रामसर वारसास्थळांच्या यादीत आणखी दोन पाणथळ प्रदेशांचा समावेश झाला आहे. राजस्थानमधील फलोदीमधील खिचन आणि उदयपूरमधील मीनार या स्थळांचा यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे या यादीतील स्थळांची संख्या ९१ वर गेली आहे.

 

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं देशात सुरू असलेल्या प्रगतीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात गौरवोद्गार काढले आहेत. जनतेच्या सहभागातील पर्यावरण जनजागृतीबाबत अतिशय उत्साहात उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाणथळ प्रदेशांची संख्या वाढवणं हा रामसळ वारसास्थळ प्रकल्पाचा उद्देश आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.