वॉशिंग्टनमध्ये बॉम्ब चक्रीवादळामुळे कोसळलेल्या झाडाखाली दबून दोघांचा मृत्यू

बॉम्ब चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या इशान्येकडील भागात आणि कॅनडाच्या पश्चिमेकडील भागात मोठं नुकसान झालं आहे. वॉशिंग्टनमध्ये चक्रीवादळाने कोसळलेल्या झाडाखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. वॉशिंग्टनमध्ये ५ लाख लोकांना वीजेशिवाय राहावं लागलं असून अनेक ठिकाणी वृक्ष आणि वीजेच्या तारा पडल्या. या चक्रीवादळाचा प्रभाव पुढचे दोन दिवस राहणार असून या भागात उद्या जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.