पंजाबच्या होशियारपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

पंजाबच्या होशियारपूरमध्ये काल मध्यरात्री एका एलपीजी टँकरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला, तर इतर २३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना होशियारपूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून १५ जणांना विशेष रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.