डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथं दहशतवादी चकमकीत दोन जवानांना वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सहा  दहशतवादी ठार झाले तर दोन जवानांना वीरमरण आलं. या दोघांपैकी एक जवान महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे. कुलगाम मध्ये चिन्नीगाम आणि मोडेरगाम इथं दहशतवादी लपून बसल्याची खबर कळताच सुरक्षा दलांनी तातडीनं कारवाई केली. मोडरगम इथल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातल्या मोरगाव भाकरे इथल्या प्रवीण प्रभाकर जंजाळ या जवानाला हौतात्म्य आलं. प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव विमानानं नागपूरला आणण्यात येणार असून त्यानंतर ते त्यांच्या मूळगावी नेलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.