June 21, 2025 3:43 PM

printer

अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर यानं आत्महत्या केल्याचं आढळलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेत अभिनय करत असलेल्या अंकुर वाढवे  यानं इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली.

 

काम मिळत नसल्याने तुषारनं हे पाऊल उचलल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. तुषार घाडीगांवकर ने लवंगी मिर्ची, मन कस्तूरी रे, बाहुबली, उनाड, झोम्बीवली, हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान यासारख्या मराठी, हिंदी चित्रपट तसंच मालिकांमध्ये अभिनय केला आहे.