डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताची क्षयरोगमुक्त राष्ट्र बनण्यासाठी वेगाने वाटचाल – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

भारत येत्या वर्षात क्षयरोगमुक्त राष्ट्र बनण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. देशात क्षयरोगाच्या प्रादुर्भावाचा दर २०१५ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे २३७ होता, तो २०२३ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे १९५ पर्यंत १७.७ टक्क्यांनी कमी झाला आहे, असं आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना आज त्या बोलत होत्या.

 

क्षयरोगाच्या रुग्णांना शोधण्यासाठी सरकारने ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती अनुप्रिया पटेल यांनी यावेळी दिली.