क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात भारतानं यश मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग अहवाल -२०२५ नुसार भारतात क्षयरुग्णांच्या संख्येत २१ टक्के घसरण झाल्याचं नमूद केलं आहे. २०१५ मधे क्षयरुग्णांचं प्रमाण १ लाखात २३७ इतकं होतं, ते २०२४ मधे १ लाखात १८७ इतकं खाली आलं आहे. याच कालावधीत क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही २५ टक्क्यानं घटलं आहे, तर उपचार मिळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५३ टक्क्यावरुन ९२ टक्क्यापर्यंत वाढलं आहे.
Site Admin | November 21, 2025 7:51 PM | tuberculosis
क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात भारताला यश