डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 11, 2025 2:37 PM

printer

अमेरिकेने टॅरिफ लागू करायला स्थगिती दिल्यानंतर भारतीय शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम

 

अमेरिकेने टॅरिफ लागू करायला ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर झालेल्या घडामोडींचे सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झाले. बाजार सुरू झाल्यापासून ते दुपारपर्यंत ही वाढ कायम राहिली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पंधराशेहून अधिक अंकांनी वाढून ७५ हजार ३००च्या आसपास व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून २२ हजार ९००च्या आसपास व्यवहार करतो आहे.