त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून बचावकार्य

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. पूरामुळे जास्त प्रभावित झालेल्या दक्षिण त्रिपुरा आणि सेपाहिजाला जिल्ह्यांमध्ये अजूनही बचावकार्य सुरु आहे. भूप्रदेशाची माहिती नसल्यामुळे, अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान एनडीआरएफ समोर आहे. गोमती आणि रुद्रसागर तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं सेपाहिजाला जिल्ह्यातल्या बटाली आणि घारांतली गावात लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे.