डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त आज देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि इतर नेत्यांनीही आज नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय जनता पक्षानं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी देशाला अखंड मानवतावादाची संकल्पना आणि भारतीय राजकारणाला एक नवीन आयाम दिला असल्याचं भाजपानं एक्स समाजमाध्यमावर म्हटलं आहे.