डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

त्री-सेवा परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं संबोधन

एकविसाव्या शतकात सशस्त्र दलांमधली परस्परांबरोबर  समन्वय साधून काम करण्याची क्षमता आणि एकता, ही परिचालनात्मक गरज बनली आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं त्री-सेवा परिषदेत बोलत होते. सुरक्षेपुढले धोके गुंतागुंतीचे बनले आहेत, असं  ते यावेळी म्हणाले. 

 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं प्रदर्शित केलेली हवाई संरक्षणामधली एकता उल्लेखनीय होती. या मोहिमे दरम्यान त्री-सेवांमधल्या समन्वयामुळे संरक्षण दलांना वेळेवर आणि अचूक निर्णय घेता आले,  असं ते म्हणाले.