डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 18, 2025 1:07 PM | TRF | US

printer

पहलगाम हल्ल्या मागे असलेला टीआरएफ गट अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित

पहलगाम इथं 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे असलेल्या द रेझिटन्स फ्रंट अर्थात टीआर एफ या गटाला अमेरिकेच्या सरकारनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टीआरएफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा न्याय व्हावा या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला अनुसरून ट्रम्प प्रशासनानं आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याप्रती बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे. टीआरएफ हा लष्कर ए तैयबाप्रणित गट आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.