मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या वृक्षलागवड उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल ५ लाख ५१ हजारांवर रोपे लावण्यात आली आहेत.
यावर्षी जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ११५८ ग्रामपंचायतींना लक्ष्य देण्यात आले होते. यंदा ७ लाख ४९ हजार वृक्षलागवडीच उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी साडेपाच लाख वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. पाचोरा एरंडोल, बोदवड, चोपडा या तालुक्यांमध्ये वृक्षलागवड अपेक्षेपेक्षा कमी झाली असून, याठिकाणी लागवड झालेल्या रोपांची संख्या १८ हजार ते २७ हजारांच्या दरम्यान आहे.
जळगाव, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, जामनेर या तालुक्यांत २८ हजार ते ३२ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. अमळनेर (४१ हजार), पारोळा (४७ हजार), मुक्ताईनगर (४९ हजार), धरणगाव (५० हजार), रावेर (५५ हजार), यावल (६६ हजार) या तालुक्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून लक्ष्याच्या जवळपास पोहोचले आहेत.