May 17, 2025 2:56 PM

printer

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या मार्गावर रेल्वे गाडी चालवण्यात येणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी संबंधित ठिकाणांचं दर्शन घडवणारं ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या मार्गावर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे .

 

भारत गौरव टूरीस्ट ट्रेन अंतर्गत आयोजित ही रेल्वे सहल येत्या नऊ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

 

मुंबईहून निघणाऱ्या या पाच दिवसांच्या विशेष सहलीत ही रेल्वे रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळगडाला भेट देऊन मुंबईत दादरला परतणार आहे.