डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी येत्या ५वर्षांत ५हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना

सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असून केंद्राने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी येत्या पाच वर्षांत पाच हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंट-आय फोर सी-च्या अर्थात भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या पहिल्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात दिली. सायबर गुन्ह्यांना सीमा नसल्यामुळे या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येण्याचं आवाहन शहा यांनी केलं.