ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क कव्हरेजचे तपशील संबंधित कंपनीने ट्रायच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मोबाईल नेटवर्क वापराबाबत पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने हे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल कंपन्यांनी संकेतस्थळावर नकाशांची सुविधा त्यामुळे संबंधित कंपन्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या वायरलेस किंवा ब्रॉडबँड सुविधांविषयीची माहिती ग्राहकांना त्यांच्या राहत्या परिसरातल्या नकाशाद्वारे मिळू शकेल.