फसवे कॉल आणि SMS रोखण्यात अपयश आल्याबद्दल ट्रायकडून मोबाइल कंपन्यांना दीडशे कोटींचा दंड

टेलिकॉम नियामक ‘ट्राय’नं स्पॅम फोन आणि मेसेज थांबवू न शकलेल्या टेलिकॉम कंपन्यांवर १५० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. २०२० ते २०२३ या वर्षातल्या दिरंगाईबद्दल ही कारवाई झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारी चुकीच्या पद्धतीने बंद करणं, स्पॅम कॉल करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई न करणं यासारख्या गोष्टींसाठी ट्रायनं हा दंड ठोठावला आहे. ट्रायच्या या कारवाईला टेलिकॉम कंपन्यांनी आव्हान दिलं आहे.