डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 4, 2025 9:28 AM | REDIO | TRAI

printer

खासगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरणाकरिता शिफारशी जाहीर

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI नं खासगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरण तयार करण्याबाबत शिफारशी जाहीर केल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकता आणि चेन्नई या चार A+ श्रेणीतील शहरांमध्ये आणि हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, सुरत, पुणे, जयपूर, लखनऊ, कानपूर आणि नागपूर या नऊ A श्रेणीतील शहरांमध्ये डिजिटल रेडिओ प्रसारण सेवा सुरू करण्यासाठी राखीव किंमत निश्चित करण्याची शिफारस प्राधिकरणानं केली आहे.

 

नवीन प्रसारकांनी सिमुलकास्ट पद्धतीनं डिजिटल रेडिओ सेवा सुरू कराव्यात, अशी शिफारस TRAI नं केली आहे. विद्यमान अॅनालॉग एफएम रेडिओ प्रसारकांना स्वेच्छेनं सिमुलकास्ट पद्धतीमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी द्यावी, डिजिटल रेडिओ प्रसारणासाठी अधिकृततेचा कालावधी 15 वर्षे असावा अशी शिफारस देखील केली आहे.