ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं सर्व वितरण व्यासपीठांना आपल्या कार्याचा मासिक किंवा त्रैमासिक अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश देशातल्या सर्व डीटीएच, हेडेड इन स्काय, मल्टी सिस्टीम ऑपरेटर आणि इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हीजन ऑपरेटरना लागू होणार आहेत.
दूरसंचार मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं की, केबल टीव्ही आणि संगणक क्षेत्राची व्याप्ती वाढत असताना ग्राहक हित आणि पारदर्शकता जपण्यासाठी हे अहवाल मागवण्यात येत आहेत. सर्व ऑपरेटरांनी निर्धारित प्रारुपात हे अहवाल सादर करायचे आहेत.