डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून तब्बल १४ तासानंतर मुंबई – गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत झाली. काल या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ चं एक पथक आज सकाळी कुडाळमध्ये दाखल झालं आहे. 

दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट दिली. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत राणे यांनी प्रशासनाला दिल्या.  आमदार वैभव नाईक यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.