डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं या वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्यानं नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. या संदर्भात अनेक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडियावर तक्रारी नोंदवल्या. नागरिकांनी केलेल्या या तक्रारींना पोलिसांनी उत्तर देत त्यांच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनांचे बिघाड आणि इतर समस्यांमुळे वडाळा, आझाद मैदानासह ठिकठिकाणी निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचे अपडेट्स शेअर केल्यानं त्याचा फायदा या परिसरातून प्रवास करणाऱ्यांना होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.