डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 17, 2025 9:12 PM | S Jayshankar

printer

अमेरिकेसोबत व्यापाराला अंतिम स्वरूप मिळायला वेळ लागेल – परराष्ट्रव्यवहार मंत्री

अमेरिकेबरोबर सध्या सुरु असलेल्या व्यापार विषयक वाटाघाटी गुंतागुंतीच्या असून, त्याला अंतिम स्वरूप मिळायला वेळ लागेल, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारतानं अमेरिकन वस्तूंवरचे सर्व कर रद्द करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केला होता, त्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी  बातमीदारांशी बोलताना हे स्पष्ट केलं.

 

भारत-अमेरिका व्यापार करार दोन्ही देशांसाठी फायद्याचा आणि व्यवहार्य ठरायला हवा, असं ते यावेळी म्हणाले. सध्या कोणत्याही देशाबरोबर व्यापार करार करण्याचं आपलं नियोजन नाही, असं ट्रम्प यांनी  या  मुलाखतीत म्हटलं होतं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.