रसायनांच्या अतिवापरामुळे शेतजमीन ओसाड झाली असून विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही, असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत राजभवनात संकल्प फाउंडेशनतर्फे ‘नैसर्गिक कृषी – अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी, असं आवाहनही राज्यपालांनी केलं.
जैन संत आणि स्वातंत्र्यसेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरच्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही आचार्य देवव्रत आणि पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या हस्ते आज झालं. यावेळी त्यांनी एका नाण्याचंही प्रकाशन केलं.