डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वैद्यकीय कारणासाठी भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ

जानेवारी ते एप्रिल 2025 पर्यंत भारतात वैद्यकीय उद्देशाने 1 लाख 31 हजारांहून अधिक परदेशी पर्यटकांचं आगमन झालं आहे. या कालावधीत भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी हे प्रमाण सुमारे 4 टक्के आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ‘हील इन इंडिया’ मोहिमेला प्रोत्साहन देत आहे. वैद्यकीय पर्यटन परिसंस्था विकसित करण्यासाठी रुग्णालये, हॉटेल्स, एअरलाइन्स आणि नियामक एजन्सीं यामधील सार्वजनिक-खासगी भागीदारी वाढवण्यावरही भर दिला जात आहे. केंद्र सरकारने 171 देशांच्या नागरिकांसाठी ई-मेडिकल व्हिसा आणि ई-मेडिकल अटेंडंट व्हिसा सुविधा वाढवल्या आहेत, असे पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा